मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या दुमजली वातानुकूलित बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मात्र दुमजली वातानुकूलित बसमधील अंतर्गत रचना, उंची, आसन क्षमता आणि उभ्याने प्रवास करण्यावर येणारी मर्यादा यामुळे वातानुकूलित दुमजली बसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत बेस्टची पहिली बस वाहतूक १५ जुलै १९२६ पासून सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्रॅम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि एकमजली बसच्या जोडीलाच दुमजली बसही प्रवाशांच्या सेवेत आली. बेस्टची पहिली दुमजली बस १९३७ साली मुंबईकरांच्या सेवेत आली. या बसला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळाली. १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. बेस्टकडे सध्या ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. या बसच्या सोबतीला आता वीजेवरील वातानुकूलित बसही दाखल होणार आहेत. त्यामुळे यापुढे प्रवाशांचा दुमजली बसगाड्यांमधूनही गारेगार प्रवास होणार आहे. बेस्ट उपक्रमाने या बस स्विच मोबिलिटी कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. एकूण ९०० वातानुकूलित बस विविध कंपन्यांकडून येत्या काही महिन्यात टप्प्याटप्यात येतील. पहिल्या टप्प्यात २०० बस स्विच मोबिलिटी कंपनीकडून दाखल होतील. सप्टेंबरपासून नवीन वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या बसचे लोकार्पण मुंबईत गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First electric double decker air conditioned bus unveiled in mumbai zws
First published on: 18-08-2022 at 19:56 IST