मुंबईत सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जात आहे. राज्यभरातून लाखो भाविक मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईला येत आहेत. दरम्यान, मुंबईतील गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील चिंचपोकळी येथील चिंतामणी गणपती हा प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी भाविकांना मारहाण केली आहे. भाविकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावत असताना काही भाविक आत शिरले, यावेळी कार्यकर्त्यांनी एका भाविकाला घेरून बेदम मारहाण केली आहे.

हेही वाचा- गणपती आगमन सोहळ्याला मुंबईत गालबोट; मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी पोलीस स्थानकाला घेरलं अन्…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यंच्या दादागिरीवर जोरदार टीका केली जात आहे. गर्दी नियंत्रण करत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिंतामणी गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य कमानीजवळ ही घटना घडली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh devotee brutally beaten by chintamani ganesh mandal workers in mumbai viral video rmm