मस्जिद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळ एका भरधाव वेगाने येणा-या कारने फूटपाथवरील ५ नागरिकांना चिरडल्याची घटना काल रात्री १२.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालक आमिन युसूफ खान यास अटक केली आहे. आमिन खान बीएमसीमधील कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. सदर कारचालकाची वैद्यकिय चाचणी केली असता तो दारू पिऊन कार चालवत असल्याचे समोर आले आहे.
आमिन खानने मर्सडिज बेन्झ या कारने चार जणांना चिरडल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेत मुनिरा शेख (२५), अलिशा शेख (४०), रशिदा शेख (२०) आणि राहुल शेख (४) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जे. जे.रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-01-2016 at 09:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run in mumbai