मुंबई : भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात पंजाबी चाळ येथे २४ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता घराची भिंत नाल्यालगत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिकेचे अग्निशमन दल, पोलिस आणि एस विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत वनिता विश्वास सावंत (६५ वर्षे), योगेश मशीर पाल ( ५ वर्षे), मनीषा मशीर पाल ( ९ वर्षे) जखमी झाले आहेत.

सर्व जखमींवर म. टि. अगरवाल रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेचे संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून पुढील तपास सुरू आहे.