मुंबई : ग्लोकोमाचे निदान व उपचार वेळेत होण्याबरोबर ते स्पर्शविरहित होण्यासाठी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींची संघटनेने पुढाकार घेतला आहे. जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागातील रुग्णांवर स्पर्शविरहित उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाला नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओस्कोपी ही उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोतीबिंदू आणि अपवर्तक दोष (रेफ्रॅक्टिव्ह एरर) यानंतर ग्लोकोमामुळे व्यक्तींमध्ये अंधत्व येण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये जवळपास ११ लाख ९० हजार नागरिकांना ग्लोकोमाचा त्रास असून, त्यातील ८ लाख ९० हजार नागरिकांना ग्लोकोमामुळे अंधत्व आले आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये दरमहा सुमारे १५० ते २०० ग्लोकोमाचे रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांची तपासणी व उपचारासाठी रुग्णालयामध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांवर स्पर्शविरहित उपचार करणारी उपकरणे उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्ह्स असोसिएशनने (आयएएसओडब्ल्यूए) यासाठी पुढाकार घेतला आहे.

संघटनेने नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओस्कोपी ही दोन उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. या उपकरणांचे लोकार्पण राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला उपस्थित होत्या. नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओस्कोपी हे ग्लॉकोमाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपकरणे समजली जातात. या उपकरणांची किंमत जवळपास पाच लाख रुपये इतकी आहे. या उपकरणांमुळे जे.जे. रुग्णालयात ग्लोकोमाचे निदान करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांवर यापुढे स्पर्शविरहित उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

उपकरणांचा वापर कशासाठी ?

डोळ्यांमधील वाढलेला दाब हे ग्लोकोमाचे महत्त्वाचे कारण आहे. डोळ्यांचा दाब तपासण्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर हे उपकरण महत्त्वपूर्ण डोळ्याला थेट स्पर्श न करता सहजपणे दाब तपासले जाते. या उपकरणामुळे रुग्णाला अधिक आराम मिळतो. तसेच तांत्रिक सहायकावरील अवलंबित्व कमी होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो. गोनिओस्कोपी या उपकरणाद्वारे आईरिस आणि कॉर्निया यामधील कोन मोजला जातो. गोनिओलेंस व स्लिट लॅम्प किंवा ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने हे परीक्षण केले जाते.

नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओस्कोपी ही अद्ययावत उपकरणे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या माध्यमातून देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी करोना कालावधीतही जे. जे. रुग्णालयाला आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी यंत्र उपलब्ध करून दिले होते.

डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai touchless of eye check up in jj hospital with advanced machinery mumbai print news css