मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने पुढाकार घेतला आहे. प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होऊ नये यासाठी एमएमआरसीने सौदी अरेबियातील रियाध शहरात असलेल्या एसीईएस या कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीशी करार केला आहे. त्या करारानुसार संबंधित कंपनीकडून मेट्रो ३ करता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, आरोपीला बंगळुरू येथून अटक

रियाध येथे आयोजित एका कार्यक्रमात सोमवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, संचालक (नियोजन आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट) आर. रमणा, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय विभागातील दूरसंचार आणि पायाभूत सुविधांचे उपमंत्री बस्सम ए. अल-बस्सम, एसीईएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अक्रम अबुरस, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. खालिद अलमाशौक, एसीईएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मजहर तसेच अमित शर्मा, सौदी एक्झिम बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नईफ अल शम्मारी, भारतीय दूतावास यांच्यावतीने मिशन आणि मनुस्मृती – समुपदेशकचे उपप्रमुख अबू माथेन जॉर्ज आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : १२४ गावांचा विकास एमएमआरडीएच्या हाती; ‘नवनगरा’साठी शासन निर्णय प्रसिद्ध, हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

मेट्रो ३ मार्गिका ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. ३३.५ किमी लांबीच्या या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. तेव्हा या मार्गिकेवरून प्रवास करताना प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा मिळावी यासाठी एमएमआरसीने एसीईएस इंडिया कंपनीशी करार केला आहे. हा करार १२ वर्षांसाठी करण्यात आला आहे. या करारामुळे ४जी आणि ५जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रो३ द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या ३३.५ कि.मी. लांबीच्या प्रवासादरम्यान संपूर्ण २७ स्थानकांवर, फलाटावर, भुयारांमध्ये अतिजलद तसेच अखंडीत मोबाईल सेवा प्राप्त होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai underground metro line 3 uninterrupted mobile service for the passengers mumbai print news css