investigation revealed popular front of india planning terrorist attack at large scale zws 70 | Loksatta

‘पीएफआय’कडून तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न

पीएफआय संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मजहर खान याच्याकडून एक पुस्तिका हस्तगत करण्यात आली.

‘पीएफआय’कडून तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून मोठय़ा प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे.

जिहादसाठी सबकुछ? हेच ब्रीदवाक्य या संघटनेने अप्रत्यक्षपणे बिंबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भविष्यात या संघटनेकडून दहशतवादी कारवायांची तयारी सुरू होती, या अंदाजास दहशतवादविरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.  पीएफआय संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मजहर खान याच्याकडून एक पुस्तिका हस्तगत करण्यात आली. त्याचे शीर्षक होते २०४७. याचा अर्थ पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार होता याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ म्हणजे सिमी या संघटनेचा थेट दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

पीएफआयचे पद्धतशीररीत्या त्याच दिशेने काम सुरू होते, हे पुणे व काही प्रमाणात औरंगाबादमधील घटनांमधून स्पष्ट होत असल्याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.  मुस्लीम युवकांना हेरून त्यांच्याप्रति सहानुभूती आणि मग जिहादची हाक दिली जात होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

सिमीवरील बंदीचा अभ्यास

सिमीवर बंदी आल्याच्या कारणांचाही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अडकले जाऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यामुळे ज्याप्रमाणे सिमीचे सदस्यत्व दिले जात होते तसे पीएफआयचे थेट सदस्यत्व न देता इतर आठ संघटनांमध्ये त्यांना विखुरले जात होते, असेही आता तपासात बाहेर आले आहे.  राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबई युनिटने कुर्ला, कांदिवली व मालाड येथून अटक केलेले पीएफआयचे सदस्य हे अनुक्रमे कापड दुकानदार,  साउंड टेक्निशिअन, वकील आहेत. मात्र हे सर्व पडद्याआड पीएफआयचे काम करीत होते. मुस्लीम युवकांना भडकविण्याचे काम करीत होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सिमीतही अशाच उच्चशिक्षित तरुणांचा भरणा होता. मात्र त्यांचा थेट बॉम्बस्फोटांशी संबंध होता. पीएफआयच्या माध्यमातूनही अशाच पद्धतीच्या कारवाया केल्या जाण्याची शक्यता होती. त्याआधीच त्यांच्या मुसक्या आवळल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सेवा पंधरवडा राबवूनही कामे खोळंबलेलीच!

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; आरोपांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती
कलापिनी कोमकली यांच्याशी आज स्वरगप्पा
शिवसेनेच्या ‘वायफाय’ घोषणेची भाजपकडून पूर्ती!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात