मुंबई : पालघर जिल्ह्यातील १,६०,९१७ विद्यार्थ्यांपैकी १,४१,२५८ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असून, उर्वरित १९ हजार विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत. या प्रकरणी सोमवारी, १४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
जगताप, प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. सन २०२४-२५ मध्ये गणवेश वाटपाची पद्धत वेगळी होती. एका गणवेशासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला शिवणकामाची जबाबदारी दिली, तर स्काऊट – गाईडचा दुसरा गणवेश शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी उशीर झाला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुधारित योजना राबवण्यात येत असून, सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशासाठी निधी थेट ट्रान्सफर करण्यात आला आहे.
या ठिकाणी समितीच स्थानिक स्तरावर कापड खरेदी करून गणवेश तयार करणार असल्याचे मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. यानंतरही सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी, १४ जुलै रोजी या बाबत बैठक घ्यावी. विलंब झाला आहे, हे स्पष्टपणे दिसते त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर विरोधात अधिवेशन संपायच्या कारवाई करावी, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. भोयर यांना दिली.