mhada announced 39 redevelopment projects complete stalled zws 70 | Loksatta

म्हाडाचे ३९ पुनर्विकास प्रकल्प ठप्प ; रहिवाशांच्या पुढाकाराबाबत कायदेशीर चाचपणी सुरू

सध्या याबाबत कायदेशीर तरतुदी म्हाडाकडून तपासून पाहिल्या जात आहेत.

म्हाडाचे ३९ पुनर्विकास प्रकल्प ठप्प ; रहिवाशांच्या पुढाकाराबाबत कायदेशीर चाचपणी सुरू
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : भाडे थकविणाऱ्या विकासकांविरुद्ध झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने जोरदार वसुली मोहीम सुरू केली असली तरी म्हाडाने अशा थकबाकीदार विकासकांविरोधात चार महिन्यांपूर्वीच कारवाई सुरू केली आहे. तब्बल ३९ पुनर्विकास प्रकल्प पूर्णपणे ठप्प झाल्याचे म्हाडाने घोषित केले आहे. यापैकी सात प्रकल्पांत रहिवाशांनी पुढाकार घेऊन प्रकल्प पुढे नेण्याचे ठरविले आहे. सध्या याबाबत कायदेशीर तरतुदी म्हाडाकडून तपासून पाहिल्या जात आहेत.

भाडे थकबाकीदार विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने महिन्याभराची मुदत देऊन त्यानंतर थकबाकी न दिल्यास सुरुवातीला विक्री करावयाच्या घटकावर स्थगिती आणि त्यानंतर थेट प्रकल्पातून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. असे दीडशे थकबाकीदार विकासक ‘झोपु प्राधिकरणात’ असून हे प्रकल्प ठप्प नसून विक्री घटकाचे काम सुरू आहे. मात्र भाडे थकबाकीदार असलेल्या म्हाडा विकासकांचे प्रकल्प ठप्प आहेत.

प्रकल्प वेळेत पूर्ण नाही केला वा रहिवाशांची भाडी थकविली, तरीही म्हाडाकडून फारशी दखल घेतली जात नव्हती. परंतु काही प्रकल्पात विकासकाकडून रहिवाशांना भाडीही दिली जात नव्हती वा प्रकल्पाचे कामही पूर्णपणे ठप्प झाले होते. याबाबतच्या तक्रारी मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे आल्या होत्या. अखेरीस मुंबई मंडळाने आढावा घेऊन पूर्णपणे ठप्प झालेल्या प्रकल्पांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी ३९ पुनर्विकास प्रकल्प पूर्णपणे ठप्प असल्याचे आढळून आले. इमारतींचे काम अर्धवट अवस्थेत असून रहिवाशांना भाडय़ांपासून वंचित राहावे लागले आहे. या विकासकांना नोटिसा काढून त्यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले. यापैकी अनेक विकासकांनी प्रकल्प पूर्ण करण्यात असमर्थता दर्शविली. असे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावेत अशी मागणी या सुनावणीच्या वेळी रहिवाशांकडून करण्यात आली. या सर्व ३९ प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र पुढे काय करता येईल, यासाठी कायदेशीर मत मागविण्यात आले आहे. यापैकी काही प्रकल्पातील रहिवासी पुढाकार घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. याबाबतही कायदेशीर तरतुदी तपासून घेण्याचे आदेश मुंबई गृहनिर्माण मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिले आहेत. 

झाले काय?

काही पुनर्विकास प्रकल्पांत विकासक रहिवाशांना भाडीही देत नव्हते अथवा प्रकल्पाचे कामही पूर्णपणे ठप्प झाले होते. याच्या तक्रारी मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे आल्या होत्या. त्यांची शहानिशा करण्यासाठी मुंबई मंडळाने आढावा घेऊन ठप्प झालेल्या प्रकल्पांची माहिती घेतली असता ३९ पुनर्विकास प्रकल्प पूर्णपणे ठप्प असल्याचे आढळून आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसरा मेळाव्याआधी शिवसैनिकांची पदयात्रा

संबंधित बातम्या

उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन
#MumbaiRains : किंग्ज सर्कलजवळ अरुंद पुलाखाली कंटेनर अडकल्याने वाहतुक कोंडी
निर्भया पथके कायद्याचा वचक निर्माण करतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास; तर गृहमंत्री म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 2nd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ? जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न
भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”
विश्लेषण: सी लिंकवर ८०, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर १०० तर ‘समृद्धी’वर १२०… महामार्गांचं स्पीड लिमिट ठरवतं कोण आणि कसं?
आता संसदेतही गाजणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट होणार आक्रमक