नामांकित व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्तींच्या ट्विटर खात्यासाठीच्या टिक म्हणजेच खुणेच्या सेवेची संकल्पना चोरल्याचा आरोप करून ट्विटरसह त्याचे मालक एलोन मस्क यांच्याविरोधात मुंबईस्थित पत्रकाराने अंधेरी दंडाधिकाऱ्यासमोर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- १०० टक्के विद्युतीकरणामुळे वर्षाला ५५६.५६ कोटी रुपयांची बचत

कंपनीने सर्वसामान्य नागरिकांच्या ट्विटर खात्यांसाठी निळ्या खुणेची, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींच्या ट्विटर खात्यासाठी तपकिरी खुणेची संकल्पना सेवेत आणली होती. मात्र ही संकल्पना आपली असून ती ट्विटर आणि कंपनीचे मालक मस्क यांनी चोरल्याचा आरोप रुपेश सिंह या पत्रकाराने केली आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपासह स्वामित्त्व हक्क कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे. मस्क यांच्याव्यतिरिक्त ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष महेश्वरी यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai based journalist alleges that twitter stole the concept of tick mumbai print news dpj