मुंबई : कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून आता सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपद्वारे प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयीसुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.एमएमआरसीएलच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील १२.५ किमीचा आरे ते बीकेसी टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते ठाण्यातील एका कार्यक्रमात या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. एमएमआरसीएलने सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानक येथून सकाळी ११ वाजता पहिली मेट्रो गाडी प्रवाशांना घेऊन धावणार आहे. पहिल्या भुयारी मेट्रो प्रवासासाठी मुंबईकर उत्सुक असल्याने सोमवारी बीकेसी आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता होत आहे. पहिल्या भुयारी मेट्रोला कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एमएमआरसीएलने क्यू आर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरसीएलने मेट्रो कनेक्ट ३ ॲप तयार केले आहे. या ॲपवर मेट्रो ३ बाबतची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा – शरद पवार नगर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल, नायगाव बीडीडी चाळीचे नाव बदलले
हेही वाचा – चार जिल्ह्यांत सुरू होणार फिरते पक्षाघात केंद्र
मेट्रो कनेक्ट ३ ॲपवर आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकांवरील सोयीसुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांना जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे? तिकीट दर किती ? गाड्यांचे वेळापत्रक यांसह अन्य सर्व प्रकारची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारी ॲपच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत. या तक्रारींचे निवारणही ॲपद्वारे केले जाणार आहे. मेट्रो स्थानाकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे का याचीही माहिती या ॲपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.