गेल्या ७२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी मुंबईतील रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी मुंबईकरांना थोडीफार कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. सध्या मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावरील गाड्या पावसामुळे १५ते २० मिनिटे उशिराने धावत असल्या तरी, मध्य रेल्वेची सेवा पावसामुळे जास्त प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने सकाळच्या वेळेत थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र, हवामान खात्याने येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
गेल्या ७२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी मुंबईतील रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.

First published on: 30-07-2014 at 08:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local trains delayed due to heavy rain