मुंबई : जगभरातील धावपटूंना आकर्षित करणारी आणि आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ ही स्पर्धा आज झाली. मॅरेथॉनमध्ये धावताना ‘बीवी सताए, हमें बताएं’ असे फलक धावपटूंच्या नजरेस पडत होते आणि हे प्रकरण नेमके काय आहे? असा विचार मनात आणून अनेकजण संभ्रमातही पडले. तर मॅरेथॉनसाठी आलेल्या काही जोडप्यांना हसू आवरले नाही. अनेकांनी लगेच छायाचित्रही टिपले. न्याय प्रयास फाउंडेशनतर्फे पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जनजागृती सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जय श्रीराम… रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणाईनं उजळून निघाला मुंबईतील सी-लिंक, पुलावर दिसला लेझर शो; पाहा सुंदर VIDEOS

दरम्यान, ‘अनेकदा पतीची काहीही चूक नसताना पत्नीकडून पतीविरोधात खोटा गुन्हा दाखल केला जातो. तसेच पतीच्या कुटुंबियांनाही खोट्या प्रकरणामध्ये अडकवून मानसिक त्रास दिला जातो. गुन्हा दाखल झाल्यामुळे पुरुषांची नोकरी जाते, समाजात नाचक्की होते आणि त्यामुळे पुरुष ताणतणावाखाली जाऊन त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही येतो. “आम्ही न्याय प्रयास फाउंडेशनतर्फे खोट्या गुन्ह्यांविरोधात जनजागृती करतो, महिलांकडून कायद्याचा होणारा गैरवापर बंद झाला पाहिजे. आपल्या देशात महिलांना वाचविण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. पण जेव्हा या कायद्याचा दुरुपयोग होतो, तेव्हा तो थांबविण्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. आम्ही पीडित पतीला व त्याच्या कुटुंबियांना कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन करतो. त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर ठेवतो’, असे न्याय प्रयास फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

हेही वाचा : ही शान कोणाची… लालबागचा राजा मंडळाला मिळालं अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं विशेष निमंत्रण

तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर उमटली. या वेगवान रस्त्यांवर न्याय प्रयास फाउंडेशनच्या सदस्यांनी पुरुषांच्या समर्थनार्थ जनजागृती करीत त्यांच्याशी संवादही साधला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai marathon nyay prayas foundation awareness for mens who are victim of fake cases filed by their wifes mumbai print news css