सीए आणि आयपीसी या परीक्षांच्या दिवशीच येणाऱ्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या (टीवायबीकॉम) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या दोन्ही परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. परंतु, आता टीवायबीकॉमच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांनी सांगितले.
उरण चोरीप्रकरणी तिघांना अटक
उरण : उरण तालुक्यातील बोकडविरा गावाजवळील महाजनकोच्या वायुविद्युत केंद्रातील गोदामात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडे चोरीचा सर्व माल जप्त केला आहे. या गोदामातून एक कोटी ६६ लाख रुपयांची चोरी झाली होती. वायुविद्युतीच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या सयंत्रातील जर्मन बनावटीच्या महागडय़ा ब्लेडचा या चोरीत समावेश आहे. याप्रकरणातील एक आरोपी फरारी आहे. उरण परिसरातील ओएनजीसीचा सुरक्षारक्षकाचे अपहरण ताजे असताना ही घटना घडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘टीवायबीकॉम’च्या परीक्षा पुढे ढकलल्या
सीए आणि आयपीसी या परीक्षांच्या दिवशीच येणाऱ्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या (टीवायबीकॉम) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
First published on: 24-09-2014 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai short news