मुंबई : परीक्षेसंबंधित विविध कारणांमुळे चर्चेत असणारे मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावरील चुकीमुळे चर्चेत आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या विद्यापीठाच्या नावातच चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर ‘ University of Mumbai’ ऐवजी ‘ University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना पदवी प्रमाणपत्र हे बोगस ठरवले जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक ‘दीक्षान्तह्णह्ण समारंभ ७ जानेवारी रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात पार पडला. यंदा ४०१ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी.) प्रदान करण्यात आली. तसेच विविध विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठात दीक्षान्त समारंभ पार पडल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मात्र पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर ‘ University of Mumbai’ ऐवजी ‘ University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी तात्काळ विद्यापीठाकडे तक्रार केली. ज्या पदवी प्रमाणपत्रावरील नावामध्ये चूक झाली आहे, अशी प्रमाणपत्रे महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे परत केली आहेत. त्यामुळे सुधारित पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाकडून पुन्हा विद्यार्थ्यांना मिळेपर्यंत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना विलंब व अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

चूक सुधारण्याचे काम

‘छपाईतील त्रुटींमुळे काही पदवी प्रमाणपत्रे ‘टायपोग्राफिकल’ चुकांसह देण्यात आली. सध्या ही चूक सुधारण्याचे काम सुरू आहे. मुंबई विद्यापीठाकडून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नवीन पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

चूक सुधारण्याचे काम

‘छपाईतील त्रुटींमुळे काही पदवी प्रमाणपत्रे ‘टायपोग्राफिकल’ चुकांसह देण्यात आली. सध्या ही चूक सुधारण्याचे काम सुरू आहे. मुंबई विद्यापीठाकडून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नवीन पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university issues graduation certificate with mumabai error zws