धवल कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये एका मुलीवर थुंकल्याबद्दल एका माणसाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तरीसुद्धा पूर्वोत्तर राज्यांमधील नागरिकांना अजूनही काही प्रमाणात टोमण्यांना आणि वर्णद्वेषाला सामोरे जावे लागत आहे.

“अशा घटना छोट्या मोठ्या प्रमाणावर होतच आहेत. पूर्वी आम्हाला चिंकी किंवा नेपाळी या नावाने चिडवण्यात यायचं. पण करोनाचा हा प्रकोप सुरू झाल्यावर एखादा पूर्वोत्तर राज्यांमधला माणूस दिसला करोना येतोय, असे म्हणून आम्हाला हीणवण्यात येतं. एखादा माझ्यासारखा माणूस ह्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो मात्र काही लोक भांडत किंवा वाद घालत बसतात. पण हे सांगताना असं आवर्जून नमूद करायला हवं की मुंबई आणि महाराष्ट्रात आम्हाला प्रचंड सुरक्षित वाटतं. इतर राज्यांच्या तुलनेने मध्ये इथे फारच कमी भेदभाव आणि वर्णद्वेष आहे” असं मूळचे पूर्वोत्तर राज्यातील असलेले पण गेल्या १९ वर्षांपासून मुंबईत स्थायिक असलेले ठर्मी रयकान म्हणाले.

पूर्वोत्तर राज्यातले लोक हे आपल्यापैकीच आहेत. आपल्याच देशातले नागरिक आहेत मात्र अनेकदा त्यांना परकी वागणूक मिळते. चिंकी, नेपाळी असे टोमणे वारंवार मारले जातात. आता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात देशाचं अर्थचक्र थांबून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण काळातही ही घृणास्पद वृत्ती शाबूत आहे.

पूर्वोत्तर राज्यांमधल्या एका मुलीवर मुंबईमध्ये अंगावर थुकल्याची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक सुद्धा केली होती हे नमूद करतात त्यांनी मुंबई पोलिसांचे विशेष आभार सुद्धा मानले. लिओ हे भाजपच्या उत्तर-मध्य मुंबई विभागाच्या अल्पसंख्यांक मोर्चा चे पदाधिकारी आहेत.

नॉर्थ इस्ट मधील राज्य म्हणजे भारताचं एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांचाही देशावर पूर्ण अधिकार आहे. असं असूनही त्यांना भेदभावाची वागणूक का मिळते? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northeast people continue to face facing racism amid corona outbreak dhk