राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज हे बुधवारी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशीसाठी हजर राहिले. तब्बल चार तास त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीतील तपशील मात्र कळू शकला नाही. आवश्यकता भासल्यास समीर आणि पंकज भुजबळ यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. या प्रकरणी विशेष पथकाला २८ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करावयाचा आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. हे दोन्ही कर्मचारी भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांवर संचालक आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj bhujbal inquiry