मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेले दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामासाठी १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव सोशल सर्व्हिस लीगने केला असल्याचा आरोप करीत सहकारी मनोरंजन मंडळाने गुरुवारी सकाळी आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंगकर्मी हेमंत भालेकर, विजय पाटकर, दिलीप दळवी, ज्येष्ठ शाहीर मधु खामकर यांच्यासह अनेक मान्यवर रंगकर्मी आणि सहकारी मनोरंजन मंडळाशी संबंधित कलाकार गुरुवारी सकाळी दामोदर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबईच्या कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून १९२२ मध्ये दामोदर नाट्यगृहाची उभारणी केली. या नाट्यगृहात झालेले विविध नाटकांचे प्रयोग, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत अनेक रंगकर्मींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात अन्नदान करायचं असेल तर…

हेही वाचा – मुंबईला पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने टाटांची औष्णिक वीजनिर्मिती सुरु राहणार

कलाकारांचे हक्काचे स्थान असलेले दामोदर नाट्यगृह जमीनदोस्त करून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनोरंजन सहकारी मंडळाने केला आहे. दामोदर नाट्यगृह पाडून त्याजागी बांधण्यात येणाऱ्या इमारतीत नाट्यगृह दिसणार नाही तोपर्यंत शासन परवानगी देणार नाही, असे शासनाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेवर शासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी दिलीप दळवी यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plan to close damodar theater in the name of redevelopment allegation of sahkari manoranjan mandal mumbai print news ssb