मध्य रेल्वेच्या ऐरोली जवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याने ठाणे-पनवेल दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील खोळंबलेली रेल्वेसेवा सुरू झाली आहे. आज (बुधवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरुन लोकलसेवा सुरू असताना ऐरोली जवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याचे आढळून आल्याने लोकल मध्येच थांबविण्यात आली होती. त्यामुळे ठाणे-पनवेल दरम्यानच्या लोकल खोळंबल्या होत्या. मध्य रेल्वे प्रशासनाने ताबडतोब रुळ दुरूस्त केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-07-2013 at 10:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway track break on trance harbour route