मुंबई : पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना ५००चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्यांसाठी धारावीकर आंदोलनाच्या पवित्र्यात असून १ मार्च रोजी धारावीत जाहीर सभा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदानी समूहाकडून धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांना मुलुंड किंवा वडाळ्यात घरे दिली जाणार आहेत. धारावीकरांची ५०० चौ फुटाच्या घरांची मागणी असताना पात्र रहिवाशांना ३५०चौ फुटाचे घर दिले जाणार आहे. या सर्व गोष्टींना धारावीकरांचा विरोध आहे. सरसकट धारावीकरांचे, पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना ५००चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्या धारावीकरांच्या आहेत. मात्र या मागण्यांकडे कानाडोळा करत धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप धारावीकरांकडून केला जाता आहे.

हेही वाचा… १८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती

हेही वाचा… मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात सत्तरीच्या आजीवर दुर्धर शस्त्रक्रिया!

या पार्श्वभूमीवर धारावीकरांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी, अदानी समूहाला असलेला आपला विरोध राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी १ मार्चला जाहीर सभेचे आयोजन केले आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून १ मार्चला धारावीतील शीव-माहीम लिंक रोडवरील पर्ल रेसिडेंन्सीजवळ सायंकाळी ५ वाजता ही जाहीर सभा होणार आहे. धारावीकर धारावी सोडून इतरत्र कुठेही जाणार नाहीत. धारावीची बीकेसी होऊ देणार नाही असा निर्धार या सभेत केला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regarding dharavi redevelopment project public meeting in dharavi on march one mumbai prin news asj
Show comments