शिवसेना ( ठाकरे गट ) आणि संभाजी ब्रिगेड यांची मंगळवारी ( ३० मे ) शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकर बैठक होणार आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्तिक मेळावा होणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बैठकीला शिवसेना ( ठाकरे गट ) नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संभाजी ब्रिगडेचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रवक्ते गंगाधर बनबरे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : आघाडीत बिघाडी? पत्रकारांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचा प्रतिप्रश्न, म्हणाले, “शिंदे-फडणवीसांमध्ये आलबेल…”

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी सांगितलं की, “शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांची बैठक एक वर्षापूर्वी झाली होती. त्या बैठकीत संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका घेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहोत, असं सांगितलं होतं. दरम्यानच्या काळात राजकीय आणि सामाजिक बऱ्याच उलथापालथ्या झाल्या, तरी संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिली आहे.”

हेही वाचा : “मिंधे गटातील ४० कोंबड्यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरेल”, ठाकरे गटाच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“महाराष्ट्रासह देश संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अशावेळेला मुलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष कोणत्याही विषयाला राजकीय रंग देत भ्रम निर्माण करण्याची गोष्ट करत असतात. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. याबैठकीनंतर ऑगस्ट महिन्यात दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा मुंबईत होणार आहे,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabhaji brigade and shivsena thackeray group held gathering in august say arvind sawant ssa