मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला महाराष्ट्राचा ब्रॅण्ड अँम्बॅसिडर बनवण्याचा विचार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती दिली आहे. सचिन सध्या राज्यसभेवर काँग्रेसकडूनच खासदार आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे.
मैदानाबाहेरचा सचिन..
महाराष्ट्राचा ब्रॅण्ड अँम्बॅसिडर बनण्यासोबतच कुपोषणासारख्या विविध प्रश्नांवर सचिनने जनजागृती करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरला महाराष्ट्राच्या पर्यटनचा ब्रॅण्ड अँम्बॅसिडर बनवण्याबाबत विचार सुरु होता. मात्र काही कारणाने यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
सचिन तेंडुलकरने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सचिन २०० वा कसोटी सामना घरच्या म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. त्यानंतर कसोटी सामन्यातून सचिन निवृत्त होणार आहे
फ्लॅशबॅक : सचिन रमेश तेंडुलकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar brand ambassador of maharashtra prithviraj chavan