ताडदेव येथील अंध मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी अन्नातून विषबाधा झाली असून काही मुलांना उलट्या, तर काही मुलांच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे सात विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी दोघांना तापही येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे मंडळाची आजची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर

ताडदेव परिसरातील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध विद्यालयातील मुलांना मंगळवारी अन्नातून विषबाधा झाली आहे. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास मुलांना उलट्या होऊ लागल्या. काही मुलांच्या पोटात दुखू लागले. सात मुलांना खूपच त्रास झाल्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात मुलांपैकी दोन मुले १२ वर्षाखालील आहेत. दोन मुलांना उलट्या आणि तापही आला. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. अनिकेत राऊत (१५), कल्पेश पवार (११), सुमित सरकार (११),  सोमनाथ (१४), अक्षय मोनिस्वारे (१४), सदाफ कुरेशी (१७) , परमेश्वर (१८) अशी या मुलांची नावे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven children hospitalised after food poisoning at blind school in tardeo mumbai print news zws