ब्युटी पार्लरमध्ये चालणारे शरीरविक्रयाचे रॅकेट कांदिवली पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून तीन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवली पश्चिमेच्या इराणी रोड क्रमांक ३ वरील चॉईस ब्युटी पार्लरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांना मिळाली होती. त्यांनी याप्रकरणी कांदिवली पोलिसांचे पथक पाठवले होते. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी तीन मुलींची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवले. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मालवणीत राहणाऱ्या नसरीन शेख (३२) आणि शब्बीर शेख (२१) यांना अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
ब्युटी पार्लरमध्ये शरीरविक्रय दोघांना अटक
ब्युटी पार्लरमध्ये चालणारे शरीरविक्रयाचे रॅकेट कांदिवली पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून तीन मुलींची सुटका केली आहे.
First published on: 05-07-2014 at 04:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex racket in beauty parlour