Shinde group determination Dussehra gathering MLAs Chief Minister residence ysh 95 | Loksatta

दसरा मेळावा भव्य करण्याचा शिंदे गटाचा निर्धार; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थनी आमदार, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उत्साहाचे वातावरण पसरलेल्या राज्यातील शिंदे गटाने पुढील आठवडय़ात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार केला.

दसरा मेळावा भव्य करण्याचा शिंदे गटाचा निर्धार; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थनी आमदार, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
एकनाथ शिंदे ( ट्विटर )

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उत्साहाचे वातावरण पसरलेल्या राज्यातील शिंदे गटाने पुढील आठवडय़ात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

खरी शिवसेना कोणाची, या संदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास मंगळवारी न्यायालयाने नकार दिला होता. या निकालाने शिंदे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास शिवसेनेस परवानगी मिळाल्याने शिंदे गट काहीसा अस्वस्थ झाला होता.

वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी समर्थक आमदारांना दिला. हा मेळावा भव्यदिव्य झाला पाहिजे, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.  आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतून जास्तीत जास्त कार्यकर्ते जमा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ आणि पुढील घडामोडी याबद्दल आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

संबंधित बातम्या

VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस
विश्लेषण: मुंबई सुशोभीकरण प्रकल्प कसा आहे?
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’
“भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: याला म्हणतात किंग कोहलीचा राजेशाही थाट! खणखणीत Six ने साजरं केलं ७२ वं शतकं; हा शॉट गोलंदाजही पाहतच राहिला
Video : पांढरी दाढी, थकलेला चेहरा, विस्कटलेले केस; ‘तू तेव्हा तशी’मध्ये तरुण दिसणाऱ्या स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक
“बॉलिवूडचा चित्रपट बनवण्याचा फॉर्म्युला….” ‘फोन भूत’ फ्लॉप झाल्यावर अभिनेता इशान खट्टर स्पष्टच बोलला
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून नव्हे…परळीतून या व्यक्तीने केला पैशांसाठी फोन!
आतड्यांमध्ये जमलेली घाण ‘हे’ ६ पदार्थ सहजपणे काढून टाकतील; कॉस्टिपेशनची समस्याही पुन्हा होणार नाही