शिळफाटा इमारत दुर्घटनेप्रकरणी गेले वर्षभर कारागृहात असलेल्या ठाणे पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अखेर जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत जामीन मिळालेल्यांची संख्या ११ झाली आहे. उपायुक्त दीपक चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बाळासाहेब आंधळे, अभियंता रमेश इनामदार आणि कारकून किशन मडके या पालिकेच्या चार अधिकाऱ्यांवर शिळफाटा इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी २४ जणांना अटक केली असून तीन जण अद्याप फरारी आहेत. गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी शिळफाटा येथे इमारत कोसळून ७४ जणांचा त्यात मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १८ मुलांचा समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावत्र पित्याकडून मुलीवर बलात्कार
मुंबई : आपल्याच सावत्र मुलीला धमकी देत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पित्यास जुहू पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो हे कृत्य करत होता. ही मुलगी १४ वर्षांची असून आईसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून तो आई घरात नसताना मुलीवर बलात्कार करत होता. या वेळी तो तिला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत असे. अखेर मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर रविवारी त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर सावत्र पित्याला बलात्कार आणि बाललैंगिक शोषणविरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.

मुलाच्या मारहाणीत वृद्ध पित्याचा मृत्यू
मुंबई : मुलाने केलेल्या मारहाणातीत ठाण्यात राहणाऱ्या  दत्ताजी साळसकर (७०) या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास साळसकर यांचे त्यांचा मुलगा शैलेश याच्यासमवेत भांडण झाले. या वेळी शैलेशने शैलेशने त्यांना मारहाण करत घरातून बाहेर काढले. जखमी अवस्थेत साळसकर यांनी अंधेरीत राहणारे मेव्हणे विष्णू परब यांना याबाबत माहिती दिली. अंधेरीला टॅक्सीने जात असताना ते बेशुद्ध झाले. पोलिसांनी साळसकर यांना कुपर रुग्णालयात दाखल केले. दुपारी बाराच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शैलेशच्या विरोधात अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीचे अमिष दाखवून ५३ लाखांची फसवणूक
शहापूर : बेरोजगार तरुणांना सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये विविध पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून शहापूर व मुरबाड तालुक्यातील १५ जणांकडून तब्बल ५३ लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. मुरबाडच्या एका पत्रकारासह सार्वजनिक बांधकाम विभागातून निलंबित करण्यात आलेला एका कर्मचाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश आहे. मंत्रालयातील उपसंचालक पदावरुन निवृत्त झालेला एक अधिकारी त्यांचा साथीदार असून तो फरार झाला आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकातील आग पोलिसांनी विझवली
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथील पॉवर रूमला लागलेली आग दोन पोलिसांनी जीव धोक्यात घालून विझवली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास येथील पॉवर रुमलाअचानक आग लागली. यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील प्रशांत गोळे आणि मनोज डोणे हे दोन पोलीस जेवणासाठी जात होते. त्यांनीअग्निप्रतिबंधात्मक उपकरणांच्या सहाय्याने आग विझवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short crime news from mumbai