भजी खाण्यासाठी पैसे देतो, असे सांगून शेजारच्या अल्पवयीन मुलीला एका झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नन्हे उर्फ केतन कदम (२१) या तरूणास नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. ठाणे येथील खोपट परिसरात पडित १२ वर्षीय मुलगी राहत असून तिच्या शेजारीच केतन कदम राहतो. १३ जुलै रोजी केतन याने तिला भजी खाण्यासाठी पैसे देतो, असे सांगून याच परिसरातील एका झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. १५ जुलैला पुन्हा त्याने असाच प्रकार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितले तर तुला बघून घेईन, अशी धमकी त्याने दिली होती. दरम्यान, रविवारी पिडीत मुलीने या प्रकाराबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विद्यार्थ्यांचा मित्रावर कटरने हल्ला
मुंबई : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दहावीतील मित्रावर भांडणाऱ्या आठवीतील मुलाने कटरने वार करण्याची घटना सोमवारी मालाड येथील फातिमा हायस्कूलमध्ये घडली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या दहावीतील मुलाला शिक्षकांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर दिंडोशी पोलिसांनी आठवीतील या अल्पवयीन मुलाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. निशांत शुक्ला (१६) या विद्यार्थ्यांने गेल्या आठवडय़ात आठवीतील दोन विद्यार्थ्यांचे भांडण सोडवले होते. त्याचा राग धरून सोमवारी आरोपीने त्याच्यावर कंपासमधील कटरने वार केला़
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jul 2014 रोजी प्रकाशित
संक्षिप्त :अल्पवयीन मुलीवर ठाण्यात बलात्कार
भजी खाण्यासाठी पैसे देतो, असे सांगून शेजारच्या अल्पवयीन मुलीला एका झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नन्हे उर्फ केतन कदम (२१) या तरूणास नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.
First published on: 22-07-2014 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short news from mumbai and thane