मुंबई : मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवाना न घेतलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी मंगळवारी भेट देवून मदत कार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतांनाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई: दुर्घटनास्थळावरून अन्य तीन जाहिरात फलकही हटवणार, बुधवारी संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करणार

यावेळी गगराणी म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडा नगर येथे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या अन्य तीन अनधिकृत फलकांवरही तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेची विहित परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीची लाखोंची कमाई, तीन दिवसांत पाच लाख रुपये उत्पन्न

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action against unauthorized boards in all administrative divisions of mumbai order of mumbai mnc commissioner bhushan gagrani mumbai print news ssb