मुंबई : घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील दुर्घटनास्थळी आणखी तीन महाकाय जाहिरात फलक असून तेही हटवण्याची कारवाई मुंबई महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. जाहिराती फलकावरील जाहिराती हटवण्याचे काम पूर्ण झाले असून या फलकाचे बांधकाम हटवण्याचे काम बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. हे फलक हटवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही असे लोहमार्ग पोलिसांनी पालिका प्रशासनाने कळवले आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आणखी तीन महाकाय जाहिरात फलक आहेत. हे फलक बेकायदेशीर असून हे फलक काढून टाकावे अशी नोटीस पालिका प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांना दिली होती. मात्र हे फलक हटवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामुग्री आपल्याकडे नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी पालिका प्रशासनाला कळवले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे फलक हटवण्याची जबाबदारी घेतली असून मंगळवारपासूनच या कामाला सुरूवात झाली आहे. हे काम बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

unauthorized boards, Mumbai,
मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांतील अनधिकृत फलकांवर कारवाई करा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश
giant billboards, railway,
रेल्वेच्या हद्दीतील ९९ महाकाय जाहिरात फलक तात्काळ हटवा, आपात्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत पालिकेची रेल्वेला नोटीस
Mumbai rdx india marathi news, Pakistan rdx Mumbai marathi news
पाकिस्तानातून मुंबईत आरडीएक्स येणार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा दूरध्वनी; रेल्वे स्थानक आणि परिसरात गस्त वाढवली
e shivneri
अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीची लाखोंची कमाई, तीन दिवसांत पाच लाख रुपये उत्पन्न
Case against two candidates, Sanjay Patil from North East Mumbai lok sabha
खर्च तपासणीस उपस्थित न राहिल्यामुळे ईशान्य मुंबईतील ‘संजय पाटील’ नावाच्या दोन उमेदवारांविरुध्द गुन्हा
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
ghatkopar hoarding collapse
मुंबई: मुलगा व सख्या भावावर काळाने घातली झडप
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!

हेही वाचा : अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीची लाखोंची कमाई, तीन दिवसांत पाच लाख रुपये उत्पन्न

हे फलक अवाढव्य असून या फलकांचा पाया भक्कम नाही. त्यामुळे हे फलक तोडताना कोणतीही दुर्घटना घडू नये याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फलक हटवण्यासाठी येणारा खर्च संबंधित प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हे तीन जाहिरात फलक टप्प्याटप्प्याने हटविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

पडलेले होर्डिंग हटवण्यासाठी प्लास्मा कटरचा वापर

पडलेला महाकाय फलक हटवण्याचे काम अद्याप सुरू असून हे काम बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे पडलेला फलक कापण्यावर मर्यादा येत आहेत. फलक कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करता येत नाही. त्यामुळे जलवाहिन्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रॉलिक कटर किंवा प्लाझ्मा कटर घटनास्थळी मागवण्यात आले आहे. प्लाझ्मा कटरमध्ये ठिणगी उडत नाही. परंतु यामध्ये प्राणवायूचा वापर केला जातो. त्यामुळे हायड्रॉलिक कटर हे अत्याधुनिक यंत्र वापरले जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या फलकाखाली काही वाहनेही सापडली असून या वाहनांमध्येही इंधन आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई: मुलगा व सख्या भावावर काळाने घातली झडप

पेट्रोल पंप चालकानेही पळ काढला

जाहिरात फलक पडल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंप चालकानेही पळ काढला होता. त्यामुळे या पेट्रोल पंपावर नक्की किती पेट्रोल आहे, भूमिगत टाकीत पेट्रोल आहे का याची माहिती तत्काळ मिळू शकली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने बीपीसीएलच्या मुख्य वितरकाला बोलावून ही माहिती घेतली व त्यानंतर बचावकार्याला सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.