मुंबई – बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरील क्रेन काही झोपड्यांवर कोसळली. या घटनेत दोनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील ओम गणेश नगर परिसरात एका एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे अचानक इमारतीवरील क्रेन कामगार राहत असलेल्या झोपड्यांवर कोसळली. सुदैवाने या वेळी झोपड्यांमध्ये कामगार नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र दोनजण जखमी झाले असून त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत कामगारांच्या झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.