मुंबईः  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमातळावर सोमवारी दूरध्वनीवरून धमकीवजा इशारा देऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विमातळावरील संपर्क कार्यालयात दूरध्वनीवर इरफान अहमद शेख नावाच्या व्यक्तीचा सोमवारी दूरध्वनी आला होता. त्याने दहशवादी, मुजाहिद्दीन आणि अन्य काही संशयास्पद वक्तव्ये केली. त्यामुळे विमानतळावरील यंत्रणा सतर्क झाली होती. तात्काळ विमानतळावर तपासणी करण्यात आली. मात्र तपासणी मोहिमेत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. याप्रकरणी सहार पोलिसानी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : एक एकरवरील पुनर्विकास : म्हाडाला घरे की अधिमूल्य? दीड वर्षानंतरही धोरण नाही; अनेक प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

यापूर्वीही राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) असाच संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. पण तपासणीत काहीच आढळले नव्हते. मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल एनआयएला गुरूवारी प्राप्त झाला होता.  तपासणीत तो पाकिस्तानातून असल्याचे निष्पन्न झाले. त्यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला होता. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथील एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हीडीओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of terrorist attack at mumbai airport case registered by the sahar police mumbai print news zws