ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे. भूषण देसाई यांनी ठाकरे गटाला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळ तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान, भूषण देसाई यांनी शिंदे गटात जाण्यामागचं कारण सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाईंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी भूषण देसाई म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.”

“माझं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही सामाजिक कार्य आहे, ते मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण आता एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारचं काम बघून आणि त्यापासून प्रेरित होऊन मी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bhushan desai join shinde group subhas desai eknath shinde rmm