wr penalty to contractor for broadcasting shinde group dussehra rally in local train mumbai print news zws 70 | Loksatta

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे लोकलमधील प्रक्षेपण परवानगीविना ; कंत्राटदाराला दंड ठोठावण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे लोकलमधील प्रक्षेपण परवानगीविना ; कंत्राटदाराला दंड ठोठावण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

मुंबई: दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये जाहिरातीसाठी असलेल्या टिव्हीवरही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, परवानगी न घेताच हे प्रक्षेपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकल गाड्यांमध्ये करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा >>>परमबीर-वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मला लक्ष्य केले ; भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामिनाची मागणी करताना देशमुख यांचा दावा

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी बसवण्यात आलेल्या एलईडी टिव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण सुरू होताच प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आणि पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याची माहिती देण्यात आली. तसेच काहींनी अशा जाहिराती करणे योग्य नसल्याचे सांगून समाजमाध्यमांवर निषेध नोंदवला. मुळातच जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी असलेल्या या टिव्हीवर राजकीय सभेचे थेट प्रक्षेपण करता येऊ शकत नाही. मात्र कंत्राटदाराने कराराचा भंग करून हे प्रक्षेपण केल्याचे समोर आले आहे. रेल्वेतील डब्यांमध्ये असलेल्या टीव्हीवर राजकीय स्वरुपाची कोणतीही जाहिरात प्रदर्शित करता येऊ शकत नाही. शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. प्रथमदर्शनी, लोकल डब्यातील टिव्हीवर दसरा मेळाव्यातील सभेचे दहा ते पंधरा मिनिटे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रक्षेपण सुरू झाल्याची माहिती मिळताच ते बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
परमबीर-वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मला लक्ष्य केले ; भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामिनाची मागणी करताना देशमुख यांचा दावा

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा