नागपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण शुक्रवारी महापालिकेचा पाच  वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आम आदमी पक्षाने महापौर दयाशंकर तिवारी यांना शहराच्या विकास कामासंबंधी पंधरा प्रश्न असलेले शुभेच्छा पत्र देत जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणी केली. मात्र महापौरांनी हे शुभेच्छापत्ररूपी निवेदनच स्वीकारले नाही. यावेळी महापौरांचा सत्कारही करण्यात आला. 

गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजपची सत्ता आणि केंद्रात गेल्या आठ वर्षांपासून सत्तेत आहे. राज्यात तर मुख्यमंत्रीही नागपुरातील होते, नितीन गडकरी हे मोठय़ा खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची पूर्ण मदत असताना शहराचा कायापालट होणे अपेक्षित आहे. अशी अनुकूल परिस्थिती असताना भाजपला महापालिकेतील सत्तेद्वारे जनसेवा करण्याची संधी मिळाली होती. शुक्रवारी महापालिकेचा कार्यकाळ संपला असताना आम आदमी पक्षाने महापौर दयाशंकर तिवारी यांचा राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखडे यांनी शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. पण सोबतच जनतेच्या मूलभूत गरजासंबंधित १५ प्रश्न असलेले शुभेच्छा पत्र दिले.  राज्य, केंद्र सरकारकडून मोठय़ा प्रमाणात प्राप्त विकास निधी आणि महापालिकेद्वारे वाढवलेले कर या माध्यमातून १५ वर्षांत नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी काय केले याची माहिती जनतेला द्यावी, अशी विनंती आम आदमी पक्षाने यावेळी केली.

असे आहेत प्रश्न 

ओसीडब्ल्यूला १५ वर्षांत किती पैसे दिले, शहर टॅंकरमुक्त झाले का, १५ वर्षांपूर्वी किती शाळा होत्या किती सुरू आहेत, किती रुग्णालये आहेत व अद्ययावत किती झालीत, कायमस्वरूपी डॉक्टर किती, किती जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले, नागनदी, पिवळी नदी सफाईवर किती खर्च केला, तलावांच्या सौंदर्यीकरणावर खर्च किती झाला. शहर बससेवा किती नफ्यात आहे, कत्रांटदाराकडे थकीत पैसे किती आहेत, किती फुटपाथ नागरिकांना चालण्यायोग्य आहेत, शौचालय किती उभारले, साफ सफाई व कचरा व्यवस्थापन सुरळीत आहे का, किती आठवडी बाजार स्वच्छ व अद्ययावत केलेत, पार्किंग व्यवस्था, नगरसेवकांना मालमत्ता कर कमी व इतरांना जास्ती का, थकीत करावर सावकारी व्याज लावण्याचे कारण काय आणि शहर स्मार्ट सिटी झाले का व नाही तर जबाबदार कोण, असे प्रश्न आपने महापौरांना विचारले आहेत.

स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांवर टीका..

भाडय़ाने राहण्यास आलेल्या तरुणींच्या पोशाखामुळे त्रास होत असल्याची तक्रार करीत सोसायटीमधील काही सदस्यांनी तरुण मुलींच्या घरात शिरून बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे संपूर्ण पुणे शहरात व्यक्तिस्वातंत्र्य आणि पोशाखस्वातंत्र्याविरोधात उभे राहिलेल्या स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांवर टीका होत आहे.

अशा प्रकारच्या वादांना अनेक घटक कारणीभूत असतात. अलीकडे कोणी कसे रहायचे हे मूळ मालक नाही, तर आसपासचे मालक ठरवितात. बांधकाम, येण्या- जाण्याच्या वेळाही वादांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे असे वाद होऊ नयेत, यासाठी आचारसंहिता आवश्यक आहे. पोशाखामुळे असा प्रकार होणे चुकीचे आहे. – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

आमच्याकडे ज्या युवती

राहतात त्यांच्याबाबत अन्य कोणत्याही रहिवाशांनी कधीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांची काही तक्रारही नाही. मात्र शेजारी राहणाऱ्यांनी आम्ही घरात नसताना घरात जाऊन युवतींना धमकाविले आणि मारहाण केली. नंतर मलाही धमकाविण्यात आले.

– ज्योती येळे, तक्रारदार