लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील २५ उपकेंद्रासाठी २६९ एकर जमीनीचे भाड़ेपट्टा करारावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी महावितरणला उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्हा सर्वप्रथम शेतीसाठी शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारा होवून शेतीला दिवसाचे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.

याबद्दल महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे व चंद्रपूर मंडलाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी. सी. यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. महावितरणच्या चंद्रपूर जिल्हयातील ५८ विविध उपकेंद्रांच्या परिसरामध्ये एकंदरीत ६७९ एकर जमिनीची आवश्यकता आहे. ४५ उपकेंद्र परिसरात जमीनीचा शोध पूर्ण झाला आहे.

आणखी वाचा-दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

खाजगी जमीन मालकांकडून २६ उपकेंद्रांच्या परिसरात ३०२.५५ एकर जागा उपलब्ध झाली असून ७ उपकेंद्रांच्या परिसरात ५८ एकर जागा अंशत: मिळाली आहे. या सव्वीस खाजगी जमीन मालकांना आता हेक्टरी सव्वालाख मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करणे आणि २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन २०२५ या अभियानाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-आनंदवार्ता! मेडिकल रुग्णालयात आता लहान मुलांच्या ‘ॲलर्जी’ची तपासणी

महावितरणच्या जवळच्या ३३/११ कि.व्हो. उपकेंद्राच्या ५ किमीच्या परिघात आहे अशा पडीक जमिनीतून सौरउर्जा पिकविण्याची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून दरवर्षी हेक्टरी सव्वा लाख रुपये मिळण्याची शेतकरी बांधवांच्या दारी सुवर्णसंधी उपलबध झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 269 acres of land available on lease to mahavitran for 25 sub centres rsj 74 mrj