नागपूर: येत्या १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत. मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर सुरक्षेसाठी १० फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: नागपूर: ‘रोजा जानेमन…’, हरिहरन यांच्या मखमली स्वराने रसिक मंत्रमुग्ध

हिवाळी अधिवेशन प्रत्येक वेळी वादळी ठरते. दोन वर्षांच्या विश्रांती नंतर होणाऱ्या अधिवेशनाबाबत उत्सुकता आहे. व्हीआयपींच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यानुसार पोलीसांच्या सूचनेनुसार नागपूरातील देवगिरी बंगल्याला १० फूट उंच आणि एक फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्याच्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा भिंतीवर काटेरी तार लावण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत. पहिल्यांदाच देवगिरी बंगल्याला इतकी मोठी सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 10 feet high security wall will constructed at the deogiri bungalow of dcm devendra fadnavis in nagpur tmb 01