चंद्रपूर: गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची ट्रकला धडक; पती- पत्नीसह ४ ठार

मुख्य मार्गावर बसलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार ट्रकला धडकली.

चंद्रपूर: गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची ट्रकला धडक; पती- पत्नीसह ४ ठार
( संग्रहित छायचित्र )

मुख्य मार्गावर बसलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार ट्रकला धडकली. या भीषण अपघातात पती-पत्नीसह ४ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. चंद्रपूर – गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

गडचिरोली येथील डीजेवादक पंकज बागडे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडुलवार या मित्रासोबत चंद्रपूर येथे डिजेचे साहित्य खरेदीसाठी बोलेरो गाडीने आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व मेहुणाही होता. साहीत्य खरेदी करून गावाकडे परत जात असताना सावली तालुक्यातील किसानगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती.

तिला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचा ‘स्टेरिंग रॉड’ तुटला आणि कार उभ्या ट्रकला जाऊन धडकली. यात पंकज किशोर बागडे (२६, रा. गडचिरोली), अनुप रमेश ताडूलवार (३५, रा. विहीरगाव ता. सावली), महेश्वरी अनुप ताडूलवार (२४, रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगिरीवार (२९, रा. ताडगाव ता.भामरागड, जि. गडचिरोली) यांचा मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम (२३, रा. चिखली ता. सावली जिल्हा चंद्रपूर) हे जखमी झाले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A car collides with a truck while trying to save a cow amy

Next Story
पुणे : प्रत्येक महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी सेनेची शाखा ; अमित ठाकरे यांची माहिती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी