चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या अय्यप्पा मंदिर भागात वनविभागाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी लाऊन ठेवलेल्या पिंजऱ्यात शनिवार १ एप्रिलला पहाटे बिबट जेरबंद झाला. या घटनेची माहिती आयुध निर्माणी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता, सदर बिबट्याला वसहतीपासून गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – हडपसर भागात वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

हेही वाचा – पुणे: महावितरणचा घरगुती ग्राहकांना ‘शॉक’; वीजदरात दहा टक्के दरवाढ

गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी व आयुध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून बिबट्याने चार ते पाचजणांना जखमी केले होते. वनविभागाने परिसरात पिंजरे लावले होते. अखेर १ एप्रिलच्या पहाटे बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या अंदाजे दीड वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाने दिली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम व चमूनी केली. आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक विजयकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A leopard trapped in a cage in ayyappa temple area near bhadravati city rsj 74 ssb