अकोला : अकोला-म्हैसांग मार्गावर आपातापानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला. योगेश सुभाष गाडे (२४, रा. अनकवाडी) असे मृताचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये नाराज गटाला पदांची खिरापत; तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी, सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

हेही वाचा – अकोला : सहलीला जाणे युवकाच्या जीवावर बेतले; दुचाकी दुभाजकावर आदळली, हेल्मेट परिधान केलेले तरीही…

योगेश गाडे रविवारी सायंकाळी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसांग मार्गावरील आपातापा येथून घराच्या दिशेने पायी जात होता. एवढ्यात भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young pedestrian died after hit by an unknown vehicle near apatapa ppd 88 ssb