नागपूर : एअर इंडिया एक्स्प्रेसने आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये आता नागपूरचा समावेश करत असल्याची घोषणा केली असून, १ डिसेंबर २०२५ पासून नागपूर-बेंगळुरू दरम्यान दिवसातून दोन उड्डाणे सुरू करणार आहे. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एअरलाइन्सने गेल्या दोन महिन्यांत पाच नवीन केंद्रांची भर घातली असून, एकूण गंतव्यस्थानांची संख्या ६० वर पोहोचली आहे. या नवीन फ्लाइट्ससाठी बुकिंग्स एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल अॅप आणि विविध बुकिंग प्लॅटफॉर्मवर सुरू झाल्या आहेत.
एअर इंडिया एक्स्प्रेसने केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा विस्तार करण्यावरही भर दिला आहे. २ डिसेंबर २०२५ पासून दिल्ली आणि पुणेहून अबू धाबीपर्यंत नवीन थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. दिल्ली- अबू धाबी मार्गावर आठवड्यात चार तर पुणे- अबू धाबी मार्गावर आठवड्यात तीन उड्डाणे चालवली जातील. त्यामुळे भारत आणि यूएई दरम्यानची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
नागपूरचा समावेश महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्स्प्रेसची उपस्थिती वाढवतो आहे. सध्या एअरलाइन मुंबईतून आठवड्याला १३० पेक्षा अधिक आणि पुणेतून ९० पेक्षा अधिक उड्डाणे चालवते. लवकरच एअर इंडिया एक्स्प्रेस नवी मुंबई विमानतळावरूनही सेवा सुरू करणार असून, येथून आठवड्याला ३५ उड्डाणे बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांकडे जाणार आहेत. नागपूर–बेंगळुरू या नवीन उड्डाणांमुळे एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच सुरू केलेल्या बेंगळुरूहून निघणाऱ्या विविध मार्गांना पूरक लाभ होणार आहे. अलीकडेच एअरलाइनने बेंगळुरूहून अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूर या शहरांपर्यंत सेवा सुरू केली आहे. यामुळे बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील एक प्रमुख केंद्र बनले आहे.
सध्या बेंगळुरूहून आठवड्याला ५३० पेक्षा जास्त उड्डाणे सुरू असून, या शहरातून बँकॉक, जेद्दा, कुवैत आणि रियाधसारख्या आंतरराष्ट्रीय गंतव्यांपर्यंतही थेट सेवा दिली जात आहे. दिल्लीहून एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्याला ४०० पेक्षा जास्त उड्डाणे चालवते, ज्यामार्फत २५ देशांतर्गत शहरांना थेट जोडले जाते. तसेच अबू धाबी, शारजाह (यूएई) आणि मस्कत (ओमान) या शहरांपर्यंतही थेट उड्डाणे सुरू आहेत.
नागपूर – बेंगळुरू या नवीन उड्डाणांमुळे एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून सुरू केलेल्या मार्गांना पूरक ठरेल. यामध्ये अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूर या शहरांपर्यंतच्या नवीन मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील एक महत्त्वाचे हब म्हणून अधिक बळकट होत आहे. सध्या एअरलाइन बेंगळुरूतून आठवड्याला ५३० हून अधिक उड्डाणे चालवते. एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून बँकॉक, जेद्दा, कुवैत आणि रियाध या आंतरराष्ट्रीय गंतव्यांपर्यंत थेट उड्डाणे देखील सुरू केली आहेत. दिल्लीहून एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्याला ४०० पेक्षा जास्त उड्डाणे चालवते, ज्याद्वारे २५ देशांतर्गत गंतव्यस्थानांना थेट जोडले जाते. तसेच, अबू धाबी आणि शारजाह (यूएई) आणि मस्कत (ओमान) येथेही फ्लाइट्स उपलब्ध आहेत.
