An atmosphere of anxiety in Nathjogi and nomadic communities due to rumors of child theft | Loksatta

मुले चोरीच्या अफवेमुळे नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

नाथजोगी, आदिवासी भटक्या समाजाच्यावतीने वाशीम येथे मोर्चा काढून, ‘आम्हीही माणसेच आहोत, आम्हाला सरंक्षण द्या’, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुले चोरीच्या अफवेमुळे नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
मुले चोरीच्या अफवेमुळे नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता

सध्या लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. समाज माध्यमांवर चुकीचे संदेश प्रसारित होत असल्यामुळे लहान मुले, महिला, विद्याथी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जिल्ह्यांत या अफवेला बळी पडलेल्या जमावाने निरापराधांना मारहाण करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, या घटना वाढतच चालल्या आहे. यामुळे भीक्षेसाठी गावोगावी फिरणाऱ्या नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा- परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

संरक्षण देण्याचे भटक्या समाजाची मागणी

मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवेतून साधूंवर आणि तृतीयपंथीयावर हल्ल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. नाथजोगी समाज वेषांतर करून गावोगावी भीक्षा मागतात. भटक्या समाजातील बांधवही गावोगावी फिरत असतात. नाथजोगी, आदिवासी भटक्या समाजाच्यावतीने वाशीम येथे मोर्चा काढून, ‘आम्हीही माणसेच आहोत, आम्हाला सरंक्षण द्या’, अशी मागणी करण्यात आली. मेडगी जोशी, नाथजोगी डवरी गोसावी, वासुदेव, चित्रकथी, गोंधळी, बेलदार, घिसाडी, कुरमुड जोशी, पात्रवट, भाठ, मसंनजोगी, बाळा बुगडे वाले गोसावी आणि भटके विमुक्त यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे आणि सरंक्षण द्यावे, असे नाथजोगी आणि आदिवासी भटक्या समाजाचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अथवा अफवा पसरवू नये. शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा- मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; समाजमाध्यमांवरील संदेशाने दहशत

१२ वर्षीय मुलाला पळवून नेल्याची चर्चा

वाशीम शहरातील काळे फाईल परिसरातील १२ वर्षाचा मुलगा शनिवारी दुपारपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता सायंकाळी तो वांगी फाट्याजवळ आढळून आला. या मुलाला पळवून नेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस मुलाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. यासंदर्भात ठाणेदार शेख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……
दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि…
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांनी सारथ्य केलेल्या गाडीचा मालक विक्की कुकरेजा कोण आहे?
चंद्रपूर: न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास; आत्महत्या की घातपात?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : महापालिकेच्या विधी विभागाकडूनच नियमांचे उल्लंघन?- पॅनेलवरील वकिलांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव
Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, विनंती करत म्हणाले “हे उकसवायचं काम…”
IND vs BAN: “आम्हाला कर्णधाराकडून धावांची गरज…”, भारताच्या माजी फलंदाजाने कर्णधार रोहित शर्माला दिला इशारा
मस्तच! ‘IPHONE’ने कोणत्याही वस्तूचे करा मोजमाप, असे वापरा ‘हे’ भन्नाट फीचर