खामगाव: बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो भूमिहीन आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमाण धारक यांच्या विविद्य मागण्याकडे राज्य शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि अतिक्रमाण धारकावर अन्याय करणाऱ्या शासकीय यंत्रणाच्या निषेधार्थ भूमिमुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ति मोर्चा या संघटनाच्या वतीने आज खामगाव उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आल्याने यंत्रणाची तारांबळ उडाली. खामगाव पोलिसांनी संघटनेचे संस्थांपक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व भूमिहीन, अतिक्रमाण धारकांना स्थानबद्ध केले. या सर्वांची संध्याकाळी सुटका करण्यात आली.

महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यानंतर उत्स्फूर्त रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा नेते रमेश गाडेकर, भरत मुंडे, अशोक इंगळे, प्रभाकर वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली भीमराव खरात, नाना तायडे, इलियास भाई, रोशन वाकोडे, रामकृष्ण पाटील, सारंगधर वाकोडे, सारंगधर टापरे आणि इतर जिल्ह्यातील पदाधिकारी, भूमिहीन, अतिक्रमाण धारक आंदोलनात सहभागी झाले., शासन प्रशासनाला जाग आणून मागण्या जाहीर करण्यात आल्या.

एसडीओ मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राज्य सरकार आणि प्रशासनाने ११ ऑक्टोबर रोजी मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेतला नाही, तर भाई १५ ऑक्टोबर पासून सत्याग्रह आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. कार्यालयाबाहेर येताच शेकडो भूमिहीन कामगारांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी यांनी भाई अंभोरे आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिस प्रशासनाने त्यांना संध्याकाळी ५ वाजता सोडले.

गांधी उद्यानात बैठक

आंदोलनानंतर खामगाव म.गांधी उद्यानात बैठक घेण्यात आली.१५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तहसील कार्यालयावर जेलभरो सत्याग्रह आंदोलनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शक्तीसिंह जाधव, महेंद्र खंदारे, गौतम जाधव, आकाश तायडे, विलास पहुरकर, शिवदास तायडे, शेषराव चव्हाण संजय पाटील, विलास पहुरकर, सलीम भाई रामसिंग सोळंके, मिलिंद वानखडे, दादाराव मोरखडे, राजाराम चोपडे, गजानन भाऊराव पाटील, रामचंद्र पाटील, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.