बुलढाणा : जिल्ह्यातील सव्वाशे गावातील हजारो ग्रामस्थांची तहान टँकर आणि खाजगी अधिग्रहित विहिरी द्वारे भागविली जात आहे. यातच एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच बहुतेक सिंचन प्रकल्पतील जल पातळीत लक्षनीय घट झाल्याने जिल्ह्यातील जल संकट तीव्र झाले आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये मिळून आज रोजी १५२.७८ दलघमी (३२.६५ टक्के) इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये आज ७१.६६ दलघमी म्हणजे केवळ ३२.१८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पामध्ये ५३.६८ दलघमी (३७.८९ टक्के) आणि ४१ लघु प्रकल्पामध्ये २७.४४दलघमी म्हणजे केवळ २६.४९ टक्के) पाणी साठा उरला आहे. मागील पावसाळ्यात अनेक वर्षा नंतर तुडुंब भरलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये ५१ टक्के, टक्के असा काहीसा समाधानकारक साठा आहे मात्र खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ९टक्के तर पेनटाकळी प्रकल्पामध्ये ४७ टक्के साठा आहे.

मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये समाधानकारक इतका ६५ टक्के साठा आहे. या तुलनेत मस प्रकल्पामध्ये ३५ टक्के), कोराडी प्रकल्पामध्ये २४ टक्के, पलढग प्रकल्पामध्ये १७टक्के, मन प्रकल्पामध्ये ३९ टक्के, तोरणा प्रकल्पामध्ये १०टक्के तर उतावळी प्रकल्पामध्ये ३२ टक्केच साठा उरला आहे. लघु प्रकल्पची स्थिती देखील बिकट आहे. एकूण ४१ लघु प्रकल्पामध्ये २६.४९ टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १७ गावांना १९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.यामध्ये मेहकर तालुक्यातील ६, बुलढाणा येथे ५, चिखली येथे ३, सिंदखेड राजा १ अशा १५ गावांसाठी प्रत्येकी एक टँकर तर देऊळगावा राजा येथील २ गावांसाठी ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मेहकर तालुक्यातील पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा व पाथर्डी या गावांना, बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड व चौथा, चिखली तालुक्यातील कोलारा, श्रीकृष्णनगर व भालगाव, सिंदखेड राजा तालुक्यातील सारगाव माळ ला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे तीन तर निमखेड येथे एक टँकरव्दारे पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील १०८ गावात ११८ विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana water shortage dam water level decline scm 61 css