चंद्रपूर : देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्च रोजी महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे चंद्रपूर परिमंडळात आयोजन करण्यात आले आहे. जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडळ स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येऊ नये म्हणून मुस्लीम बांधवांकडून मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद

या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. बल्लारपूर रोडवरील बाबुपेठ कार्यालयात, सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच सर्वच ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये वीजसुरक्षेची शपथ, वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्तरावर ४ मार्च रोजी होणाऱ्या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय? डॉ. मोहन भागवत यांचा सवाल

चंद्रपूर परिमंडळात ‘लाईनमन’ म्हणजेच प्रकाशदूत किंवा जनेतचा मित्र ‘जनमित्रांनी ’ चंद्रपूर व गडचिरेालीसारखा दुर्गम प्रदेश, जंगल, दऱ्या खोरे, पहाडावर काम कधी वादळ कधी वारा, पूर, पाऊस तर कधी कडाक्याची थंडी. हे सर्व ऋतू एकप्रकारे महावितरणच्या कर्मचाऱ्याची परीक्षा पहात असतात. गडचिरेालीसारख्या दुर्गम जंगली भागात शकडो किमी वीजवाहिनीची देखभाल दुरुस्ती, तर कधी पावसात, नदीनाल्यातून गेलेल्या वीजवाहिन्या, इंसुलेटर्सची दुरुस्ती वीजग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर दुरुस्त होणे हे एकमेव ध्येयाने विजेरी, डिसचार्ज रॅाड, वितळतार इ. इत्यादी साधने घेऊन, चंद्रपूर वाघांचे नंदनवन, अशा या वाघासारखे हिंस्त्र प्राण्याच्या सान्निध्यात रात्री अपरात्री वीजपुरवठा सुरळीत केला आहे. भर उन्हात दुपारी १२ ची वेळ किंवा संध्याकाळ, रात्र केव्हाही वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार सोडवण्यासाठी लाईनमन आपली, कवच कुंडले, रबराचेहातमोजे, डिस्चार्ज रॉड, हारनेस, झुला घेवून वीजेच्या खांबावर रोहित्रांवर काम उन्हाच्या चटक्याची पर्वा न करता, मार्च, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत महावितरणच्या प्रकाशदूतांनी तांत्रिक स्वरूपाच्या ४३ हजार ३३४ तक्रारी भर उन्हातान्हात, रात्रीच्या उकाड्यात, कडाक्याच्य थंडीत व पावसात, जंगलात वाघ अस्वले तथा वण्यप्राण्यांच्या सान्निध्यात सोडवल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government decided to celebrate linemans day on 4th march 2023 rsj 74 zws