चंद्रपूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी नूसार मार्च महिन्याच्या ३१ दिवसांपैकी ९ दिवस अत्याधिक प्रदूषित तर १८ दिवस साधारण प्रदूषण आणि केवळ ४ दिवस समाधानकारक प्रदूषणाची नोंद घेण्यात आली आहे. आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपूर शहरात मार्च महिन्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. विशेष म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असे सलग तीन महिने प्रदूषणात सातत्याने भर पडत असल्याने आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील जानेवारी व फेब्रुवारी या सलग दोन महिन्यात सर्व दिवस प्रदूषित होते. त्याहीपेक्षा जास्त प्रदूषण मार्च महिन्यात आढळले. या महिन्यात ९ दिवस तर अत्यंत खराब प्रदूषण आढळले. आणि १८ दिवस जास्त प्रमाणात प्रदूषण होते. महिन्यातील २६ दिवस धूलिकण १० मायक्रो मीटर तर ५ दिवस २.५ मायक्रो मीटर आकाराचे सुक्ष्म धुलीकनाचे प्रदूषण होते. ते पाहता हे वाढलेले प्रदूषण नियम न पाळता चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदल्यामुळे झालेले आहे. याला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून हेच लक्षात येते.

विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे, नागरिकाना जो नाहक त्रास झाला आणि आरोग्यासाठी धोकादायक प्रदूषण वाढले यासाठी प्रशासनाला जबाबदार धरून नागरिकांना मोफत औषध उपचार दिले गेले पाहिजे अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केली. प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, चांगले आणि स्वच्छ रस्ते ठेवणे, शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, बेटरी वर चालणारी वाहने वाढविणे, सार्वजनिक वाहने वापरने, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उदयोगांणी प्रदूषण रोखणे, नागरिकांनीसुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे, स्मोग टॉवर्स, फॉग मशीन किंवा कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय आहेत. प्रशासनाणे कडक उपाय योजना राबऊन प्रदूषण स्रोत कमी करावे तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल.

चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अंतर्गत प्रदूषित शहराच्या यादीत मोडत असून येथे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण करण्याची मनाई आहे. असे असताना बांधकाम कंपनी ला पर्यावरण समधी विविध अटी घालायला पाहिजे. चंद्रपूरच्या मागील ३ महिन्यापासून सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदकाम केल्या मुळे प्रदूषणात भर पडली आहे. शहरात कुठलेही बांधकाम रात्री करावे, लोकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून दिवसा पाणी शिंपडावे.

प्रदूषणाची कारणे

वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. चंद्रपूर शहरात अलीकडे शासकीय विकासकामे, विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्यामोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.

प्रदूषणामुळे रोगराईत वाढ

प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्यांना हानिकारक असते ,तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकाय टिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.

चंद्रपूरचे पालकमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, पदवीधर आमदार ॲड. अभिजित वंजारी शहरातील खड्डे, प्रदूषण आणि इतर समस्यांवर गप्प आहेत. लोकांना आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले असतांना लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur residents have been suffering from pollution and health problems for three months rsj 74 ssb