Chief Justice Dhananjay Chandrachud will come to Nagpur for the first time on February 11 | Loksatta

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ११ फेब्रुवारीला पहिल्यांदा येणार नागपुरात

नागपूरमधील राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीश हजेरी लावणार आहेत.

Chief Justice Dhananjay Chandrachud
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत सोहळा ११ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- ‘अमृत काळात तरी भटके-विमुक्तांना नागरिकत्वाचा अधिकार द्या’; बाळकृष्ण रेणके यांची मागणी

शैक्षणिक सत्र २०१६ पासून राष्ट्रीय विधी विद्यापीठाची पहिली तुकडी सुरू झाली. त्यानंतर करोनामुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला होता. त्यामुळे पहिला दीक्षांत सोहळा यंदा होत आहे. यामध्ये एल.एल.बी. पदवीच्या दोन तुकड्या आणि एल.एल.एम. पदव्युत्तरच्या पाच तुकड्यामधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ फेब्रुवारीला होणाऱ्या दीक्षांत सोहळ्यामध्ये पदवी प्रदान करण्यात येईल. वारंगा बुटेबोरी येथील विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे या कार्यक्रमानिमित्ताने पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:09 IST
Next Story
‘अमृत काळात तरी भटके-विमुक्तांना नागरिकत्वाचा अधिकार द्या’; बाळकृष्ण रेणके यांची मागणी