नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. शिवरायांचा जन्म हा शिवनेरीवरच झाला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी शिंदे नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भाजप नेते. आ. प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत शिंदे यांना विचारणा केली असता, शिवरायांचा जन्म शिवनेरीवरच झाला असे शिंदे म्हणाले. शिवराय सर्वांचे दैवत आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ज्या गतीने समृध्दी महामार्गाचे काम झाले त्याच गतीने महाराष्ट्राचे सरकार काम करीत आहे, असे शिंदे म्हणाले.
First published on: 04-12-2022 at 13:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde said in nagpur that shivaji maharaj was born at shivneri fort tmb 01