नागपूर: एका बाळाला श्वास घेण्यात अडचण येत होती. तपासणीत बाळाला हृदयातून फुफ्फुसात जाणारी दोन ऐवजी एकच रक्तवाहिनी असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने बाळाला जीवदान मिळाले. जगात या आजाराचे ४०० रुग्णच नोंदवले गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लकडगंजमधील न्यू इरा रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, योगिता कारेमोरे या महिलेला रुग्णालयाच्या संचालक डॉ. अर्चना संचेती यांच्या मार्गदर्शनात दाखल करण्यात आले. योगिताने १२ जूनला बाळाला जन्म दिला. परंतु, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉ. अखिलेश दंडाळे, डॉ. समित उमाटे यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले.

हेही वाचा… बुलढाणा: ‘जोगेश्वरी’ला पूर; येनगावमध्ये पाणी शिरण्याची चिन्हे

प्राथमिक हृदयातून फुफ्फुसात जाणारी दोन ऐवजी एकच रक्तवाहिनी असल्याने फुफ्फुसावर रक्त शुद्धीकरणाचा भार वाढल्याचे समोर आले. नातेवाईकांच्या परवानगीने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. आता बाळ योग्यरित्या श्वास घेत आहे.

अशी झाली शस्त्रक्रिया…

बाळाला शस्त्रक्रियेपूर्वी श्वास घेण्याचे यंत्र जोडले गेले. एकाच फुप्फुसाने श्वास घेतले जावे म्हणून प्राणवायू संतुलित ठेवले गेले. बाळाच्या फुफ्फुसाचा एक भाग भ्रष्ट झाला. तेथे न्यूमोथोरॅक्स तयार झाला. त्यादरम्यान डॉक्टरांनी बाळाच्या छातीमधे छिद्र करून नळीद्वारे हवा बाहेर काढली. हृदयावरील उच्च रक्तदाब औषधांनी कमी केला. यशस्वी उपचाराने बाळ बरे झाल्याचे, डॉ. अखिलेश दंडाळे यांनी सांगितले. डॉ. समित उमाटे म्हणाले, जगात या आजाराचे केवळ चारशे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complicated surgery on a newborn baby due to difficulty in breathing mnb 82 dvr