बुलढाणा : येथील बुलढाणा-चिखली राज्य मार्गावरील शाम धाबा परिसरात आज अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला.
मृतकाची ओळख पटली नसून तो सैलानी यात्रेसाठी आलेला भाविक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. युवक हा २५ ते ३० वयोगटातील असून त्याला दाढी आहे. केस बारीक आहेत. तसेच त्याने लोअर पँट घातली आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून काही तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या शरीरावर कुठल्याच प्रकारचे घाव, जखमा किंवा मार नाही. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला, हे प्रथमदर्शनी गूढ आहे.