चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेंभुर्डा-पिसदुरा येथील ६५ मिलियन वर्षांपूर्वीच्या विशालकाय ‘डायनोसॉर’चे एकमेव जीवाश्म स्थळ नष्ट झाले असून भावी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आता ते उपलब्ध नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात केवळ टेंभुर्डा-पिसदुरा या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ‘डायनोसॉर’चे जीवाश्म आढळतात. भद्रावती तालुक्यातदेखील अल्प अवशेष मिळाली आहेत. परंतु पिसदुरा येथे त्यांची हाडे, विष्ठा, शाख-शिंपले आणि वनस्पती जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळत होती. प्रा. सुरेश चोपणे यांनी १९९९ पासून आजपर्यंत ह्या परिसरात संशोधन करून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले होते. या परिसराची पुन्हा पाहणी केली असता येथील सर्व जीवाश्मे जवळजवळ नष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले. आतापर्यंत त्यांनी गोळा केलेले हे अमूल्य पुरावे संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिगत अश्म संग्रहालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा…यवतमाळ : शासकीय जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध असूनही येथे पुरातत्व विभागाचे संग्रहालय होऊ नये, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक मूर्त्या चोरी जात असून ही स्थळे अतिक्रमित होत आहेत. जिवती येथील जीवाश्म स्थळावरून काही संशोधक आणि भूशास्त्र विद्यार्थ्यांनी अभ्यासाठी जीवाश्मे गोळा करून संपवून टाकले. पिसदुरा हे स्थळ संरक्षित न केल्याने ‘डायनोसॉर’चे जीवाश्मे विविध कारणाने आज गायब झाली आहेत. शेतीची कामे, शेतीसाठी अतिक्रमण, बाहेरून येणाऱ्या संशोधक आणि लोकांनी जीवाश्मे घेवून जाणे आणि विकणे, ही यामागील कारणे आहेत.

हेही वाचा…नागपूर : अंबाझरी तलावाबाबत गांभीर्याचा अभाव

ज्वालामुखीमुळे ‘डायनोसॉर’चा मृत्यू

६५ दशलक्ष वर्षांपूर्वी एक विशाल उल्का पृथ्वीवर आदळली आणि त्याच दरम्यान पृथ्वीवर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होऊ लागले. ज्वालामुखीतील लावारस उत्तर-पश्चिमेकडून चंद्रपूरकडे वाहत आला आणि त्याखाली त्यावेळी विकसित झालेले प्रचंड आकाराच्या ‘डायनोसॉर’ प्रजातींचे अनेक प्राणी इथे आणि महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले. एका मागोमाग एक बेसॉल्ट खडकांचे थर साचल्याने पश्चिम महाराष्ट्रात ते खूप खाली गाडल्या गेले तर चंद्रपूरकडे बेसॉल्ट खडकाचा थर जाड नसल्याने तो लाखो वर्षांत क्षरण झाला आणि ६ कोटी वर्षांपूर्वीचे ‘डायनोसॉर’ जीवाश्म रूपाने बाहेर येवू लागले. ‘डायनोसॉर’ची जीवाश्मे वर्धा, गडचिरोली आणि उमरेड परिसरातही मिळाली आहेत. परंतु तिथेही आता अवशेष शिल्लक राहिलेले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Destruction of 65 million year old dinosaur fossil site in chandrapur rsj 74 psg
First published on: 05-05-2024 at 13:18 IST